Skip to Content
साहित्य -:
- रवा – १ कप
- कांदा – १
- टोमॅटो – १
- वाटाणे – पाव वाटी
- हिरव्या मिरच्या – ३-४
- लसूण पाकळ्या – ४-५
- उडीद डाळ / चणाडाळ – १/२ टेबलस्पून
- शेंगदाणे – १ टेबलस्पून
- मीठ – गरजेनुसार
- जिरे – मोहरी – १ टीस्पून
- हिंग – १/८ टीस्पून
- कढीपत्ता – ५-६ पान
- कोथिंबीर – आवडीप्रमाणे
- लिंबुरस – १ टीस्पून
- तेल – फोडणीसाठी
- पाणी – गरजेनुसार
कृती -:
- गॅसवर एका कढईमध्ये कमी गॅसवर रवा भाजून घ्यावा व थंड होण्यासाठी दुसऱ्या डिशमध्ये काढून ठेवावा .
- त्याच कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे तळून बाजूला काढावे नंतर त्यात डाळ तळून तीदेखील बाजूला काढावी .
- एका बाजूला कांदा – टोमॅटो बारीक चिरून घ्यावा .
- उरलेल्या तेलामध्ये मोहरी टाकून तडतडू द्यावी नंतर जिरे टाकावे .
- लसूण – कांदा बारीक कापून टाकावा व एक २ मिनिटे हलवावे . हिरवी मिरची कापून टाकावी , हिंग , कढीपत्ता टाकावा . हिरवे वाटाणे टाकून १ मिनिट झाकण ठेऊन वाफ घ्यावी .
- नंतर त्यात रवा , तळलेले शेंगदाणे , डाळ टाकावी व आवश्यक तेवढे पाणी टाकावे .
- हे सर्व करत असतांनी गॅस कमीच असू द्यावा . जेणेकरून आपल्या हातावर वाफ वैगरे येणार नाही .
- नंतर मीठ टाकून , हलवून एक ३ मिनिटे झाकण ठेऊन वाफ घ्यावी .
- सर्वात शेवटी लिंबुरस टाकावा व वरुन कोथिंबीर टाकावी .
- सर्व्ह करतानी आपल्या आवडीप्रमाणे बारीक शेव , डाळिंबाचे दाणे यांनी गार्निश करावे .
Related