Skip to Content
साहित्य -:
- पोहे – २५० ग्रॅम
- कांदा – ३ मोठाले
- हिरवी मिरची – ३-४
- कढीपत्ता – ५-६ पाने
- हळद पावडर – १/४ टीस्पून
- शेंगदाणे – २ टेबलस्पून
- मीठ – गरजेनुसार
- साखर – आवडीप्रमाणे
- जिरे – मोहरी – १ टीस्पून
- हिंग – १/८ टीस्पून
- पाणी – पोहे भिजवण्यासाठी
- तेल – आवश्यकतेनुसार
- कोथिंबीर – आवडीप्रमाणे
कृती -:
- एका स्टीलच्या चाळणीमध्ये पोहे पाणी टाकून भिजवून घ्यावे व बाजूला ठेवावे
- गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे , त्यात शेंगदाणे तळून घेवून पोहेवर टाकावे
- नंतर तेलामध्ये मोहरी तडतडू द्यावी , जिरे टाकावे , कांदा बारीक कापून परतावा
- इकडे पोहेवर मीठ , साखर टाकावी .
- हिरवी मिरचीचे तुकडे करून कांदासोबत टाकावे.
- कढीपत्ता टाकावा , हळद पावडर , हिंग टाकावा छान २ मिनिटे परतवून घ्यावे .
- पोहे टाकून ४-५ मिनिटे परतावे व वरतून कोथिंबीर घालावी .
- सर्व्ह करतानी शेव व लिंबुरस टाकावा .
Related